
पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज ०८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आज जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व महिलांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला आणि संस्थेच्या वतीने सर्व महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच वर्ग ३ री च्या विद्यार्थिनीनी विविध क्षेत्रातील अग्रणी भारतीय महिला यांची वेशभूषा सादर केली. या प्रसंगी प्रभात फेरी आयोजित करण्यात आली.

