३०. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल ची १० वी १००% टक्के निकालाची परंपरा कायम..

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल चा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज २९ मे २०२४ रोजी घोषित करण्यात आला.

बुरहानी

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वर्षासाठी इयत्ता दहावीला एकूण १०७ विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्रथम क्रमांक कु. नयना वाल्मिक शाहपुरे (९७.४०%), द्वितीय क्रमांक कु. वैष्णवी बापू पाटील (९५.८०%), तृतीय क्रमांक कु. नीरज हेमंत कुलकर्णी (९५.२०%) , चौथा क्रमांक कु. तनय संदीप मोराणकर (९४.४०%),, पाचवा क्रमांक कु. अन्शिका निलेश मिश्रा (९३.८०%). यांनी पटकवला आहे. तसेच एकूण १०७ पैकी ९३ विद्यार्थी विशेष श्रेणीत, १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हा. चेअरमन श्री. मुस्ताफाभाई लकडावाला व इतर संचालकांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले. मुलांच्या या यशामागे प्रशासकीय अधिकारी श्री. बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, उप-प्राचार्या सौ. अश्विनी सोमपुरकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page