२९. न्यू बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल ची १० वी १००% टक्के निकालाची परंपरा कायम..

nbems pass

पाचोरा येथील न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पुनगाव रोड पाचोरा चा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज २७ मे २०२४ रोजी घोषित करण्यात आला.

nbems pass

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ वर्षासाठी इयत्ता दहावीला एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्रथम क्रमांक कु. दर्शना जितेंद्र पाटील (९५%), द्वितीय क्रमांक कु. प्रशांत सुनील पाटील (९१.६०%), कु. तनुजा विकास पाटील (९१.६०%), तृतीय क्रमांक कु. कृष्णा रवींद्र पाटील (९१.२०%), चौथा क्रमांक कु. श्रुती निखील नागणे (९०.६०%), कु. रागिणी भाऊसाहेब ठाकरे (९०.६०%),मेघा अशोक अहिरे (९०.६०%), पाचवा क्रमांक कु. प्राची संजय पाटील (९०.४०%). पटकाविले आहेत. तसेच एकूण ३० पैकी २५ विद्यार्थी विशेष श्रेणीत, ४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, १ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, व्हा. चेअरमन श्री. मुन्नावरभाई बदामी व इतर संचालकांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले. मुलांच्या या यशामागे प्राचार्य श्री. डी. पी. देवरे, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page