२७-दाऊदी बोहरा समाज व बूरहानी गार्ड इंटरनॅशनल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

IMG 20231020 WA0350

दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सैय्यदना मुप्फद्दल सैफुद्द्दीन यांचा 80 वाढदिवसा निमित्ताने दाउदी बोहरा समाज आणि बुरहानी गार्ड इंटरनॅशनल यांच्या मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिर बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.

IMG 20231020 WA0349

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सैय्यद साहेब पाचोरा प्रमुख मुल्ला अम्मार शाकीर यांनी मार्गदर्शन करतांना सैय्यदना साहेबांची शिकवण त्याग, मूल्य समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी प्रेरित करतात इतरांनी त्याचा आदर्श घ्यावा असे नमूद केले.

shibir

कार्यक्रमास आमदार किशोर अप्पा पाटील माजी.आमदार दिलीप भाऊ वाघ अमोल भाऊ शिंदे, मा.वैशालीताई सुर्यवंशी पाचोरा न.पा.प्रशासक श्रीमती शोभाताई बाविस्कर, डी. वाय. एस. पी साहेब, पी. आय साहेब, शेख. कासीमभाई लाकडावाला ,अझहर खान उपस्थित होते.

IMG 20231020 WA0353

शिबिरात सर्व आजरावर मोफत आरोग्य तपासणी, मोफत रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्त तपासणी 50% सूट देण्यात आली.

IMG 20231020 WA0352

तसेच मा.वैशालीताई सुर्यवशी यांनी 100 मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येईल असे जाहीर केले . याप्रसंगी आमदार किशोर अप्पा पाटील यांनी विचार व्यक्त करतांना बोहरा समाजाचे कार्य प्रेरणा दायी असून उपक्रमाचे कौतुक केले.

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 300 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page