WhatsApp Image 2023 02 22 at 3.33.20 PM

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज २२ फेब्रुवारी २०२३ रोजी जनमत प्रतिष्ठान परिवार जळगाव आयोजित जनरल नॉलेज स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थांना जनमत प्रतिष्ठान परिवार यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या स्पर्धेत वर्ग ४ थी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

WhatsApp Image 2023 02 22 at 3.34.43 PM

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हा. चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, पर्यवेक्षिका सौ. अश्विनी सोमपुरकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यात एकूण ३८ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच या बक्षिस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Other Links

By Pawan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page