३१. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

आज १५ जून २०२४ रोजी  बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २०२४-२५ या  शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरवात करण्यात आली.

gift_distribution

आज रोजी उपस्थित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी रांगोळ्या तसेच शाळेच्या इमारतीची सजावट करण्यात आलेली होती. विविध ठिकाणी स्वताच्या हाताने तयार केलेले सेल्फी पोइंट तयार करण्यात आले.

WhatsApp Image 2024 06 15 at 10.15.42 PM

शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरवात दैनंदिन प्रार्थनेने करण्यात आली. शाळेच्या प्रथम दिनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे  संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सेक्रेटरी श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लाकडावाला, बुरहानी शाळेचे प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राउत, उपमुख्यध्यापिका सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले आणि सर्व मुलांना चॉकलेट ही वाटण्यात आले.

WhatsApp Image 2024 06 15 at 10.15.43 PM

कार्यक्रमानंतर मुलांनी शाळेच्या आवारात तयार करण्यात आलेला सेल्फी पोइंट मध्ये फोटो काढून आनंद व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©2024 BEMS WordPress Theme by WPEnjoy

You cannot copy content of this page