पाचोरा येथील न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पुनगाव रोड पाचोरा चा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज २ जून २०२३ रोजी घोषित करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ वर्षासाठी इयत्ता दहावीला एकूण ४१ विद्यार्थी प्रविष्ट होते. सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून प्रथम क्रमांक कु. श्रावणी निलेश पाटील(९५.८०%), द्वितीय क्रमांक कु. यश अमोल पाटील (९४.२०%), तृतीय क्रमांक कु. रोशनी विलास पटाईत (९३.२०%), चौथा क्रमांक कु. सुमित दीपक पाटील (९२.६०%), पाचवा क्रमांक कु. भूमी उत्तम चव्हाण (९२.४०%) व कु. प्राची सचिन महाजन (९२.४०%). तसेच एकूण ४१ पैकी ४० विद्यार्थी विशेष श्रेणीत, १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत श्रेणीत उत्तीर्ण झाले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, व्हा. चेअरमन श्री. मुन्नावरभाई बदामी व इतर संचालकांनी सर्व विद्यार्थी यांचे कौतुक केले. मुलांच्या या यशामागे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. तसेच संस्थेचे संचालक मंडळ यांनी मुलांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्या दिल्या.