16. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा – ऑलम्पियाड स्पर्धेचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न

पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज २८ फेब्रुवारी २०२३ रोजी ऑलम्पियाड स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत वर्ग १ ली ते 3 री पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून यांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बुरहानी

बक्षिस वितरणाचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी व व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला तसेच श्रीमती भगवती राऊत, सुपरवायजर सौ. अस्मिता पाटील, श्रीमती. ज्युली फर्नांडीस, श्री. उमेश मोरे, श्री. शरद गीते मंचावर उपस्थित होते.

तसेच या बक्षिस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Other Links

  1. Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
  2. Instagram Story:- The way to a complaint of Instagram story
  3. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची शैक्षणिक सहल संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page