पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये आज २९ ऑगस्ट २०२३ रोजी रक्षाबंधन उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील वर्ग नर्सरी ते ४ थी च्या विद्यार्थींनी मुलांना राखी बांधून आणि मुलांनी चॉकलेट देऊन बहिण भाऊ या पवित्र नात्यातील गोडवा वाढवला आहे.
या प्रसंगी सर्व शिक्षकांनी फुल, चोकलेट तसेच मुलांनी तयार करून आणलेल्या वेगवेगळ्या राख्या, पोस्टर लाऊन शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील यांनी सर्वाना भाऊ बहीणीच्या पवित्र नात्याबद्दल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला उपस्थित होते. तसेच अध्यक्ष, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि इतर संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या.