४८. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने भव्य मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर संपन्न

पाचोरा, दि. २८ जुलै : विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आजारांचे वेळेवर निदान व्हावे तसेच लहान वयापासूनच आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल, पाचोरा येथे रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नर्सरी ते इयत्ता चौथी च्या एकूण ४०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

medical_camp

शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगावचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रशासन सेक्रेटरी डॉ. स्वप्निल पाटील प्रकल्प सेक्रेटरी डॉ. प्रशांत सांगडे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. अमोल जाधव, उपाध्यक्ष डॉ. अजयसिंह परदेशी, संजय कोतकर, चंद्रकांत लोढाया, पिंकीताई जिनोदिया, संजय पाटील, गिरीश दुसाने, बुऱ्हानी संस्थेचे अध्यक्ष हातिम भाई बोहरी, सेक्रेटरी मोहम्मद भाई बोहरी, स्कूल कमिटी चेअरमन ताहेरभाई कपाशी, व्हाईस चेअरमन मुस्तफा लकडावाला, प्रशासकीय अधिकारी बी. एन. पाटील, शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य उपस्थित होते.

शाळेतर्फे सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. स्वप्निल पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले

medical_camp2

या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. अमोल पाटील, डॉ. ग्रीष्मा पाटील, डॉ. रोहित तावरे, डॉ. अनुराधा तावरे, डॉ. किरण राजपूत, डॉ. आनंद जैन, डॉ. सचिन चौधरी, डॉ. मुकेश तेली, डॉ. उमेश राठोड, डॉ.सिद्धांत तेली, डॉ. राहुल काटकर, डॉ. शुभेच्छा खिंवसरा, डॉ. जागृती सोनवणे, डॉ.शर्वरी तकाटे, डॉ. आदिती पाटील, डॉ. तेजस्विनी पाटील या तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांच्या दातांची तपासणी, उंची, वजन, सर्वसाधारण शारीरिक तपासणी तसेच आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना दैनंदिन स्वच्छता, दातांची योग्य काळजी, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

medical_camp3

शिबिरादरम्यान प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचार व वैद्यकीय सल्ला घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग घेत डॉक्टरांकडून आरोग्याविषयी उपयुक्त माहिती जाणून घेतली.

medical_camp4

यावेळी शाळेचे प्राचार्य यांनी रोटरी क्लब ऑफ पाचोरा भडगाव व उपस्थित सर्व डॉक्टरांचे स्वागत करून समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या अशा सेवाभावी उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. भविष्यातही अशा प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

medical_camp5

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यास मोठी मदत होत असल्याची भावना व्यक्त केली.

रोटरी तर्फे डॉ प्रशांत सांगडे व शाळेतर्फे बी एन पाटील सर यांनी आभार मानले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अस्मिता पाटील, मुख्याध्यापिका भगवती राऊत यांचे सह सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page