आज दिनांक १४/०२/२०२३ रोजी रायगड येथे पार पडलेल्या राज्य स्तरीय कृस्ती स्पर्धेत पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थीनी कु. शरवरी कुलकर्णी तसेच बुरहानी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी यांची मुलगी हिने कुस्ती स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकविले.
कु. शरवरी कुलकर्णीस शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मनिषा पाटील, क्रिडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी तसेच महावीर व्यायाम शाळा पाचोरा येथील कुस्तीपटू श्री. दिनेश पाटील याचे मार्गदर्शन लाभले.
राज्य स्तराहून शाळेला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल कु. शरवरी कुलकर्णी चे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Other Links
- Thrilling Feature to Install WhatsApp on 2 different devices with the same number
- Instagram Story:- The way to a complaint of Instagram story
- Health Benefits of Coffee
- रंगोत्सव आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न