6. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मधील कु. शरवरी कुलकर्णीची राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

बुरहानी

आज दिनांक १७/०१/२०२३ रोजी नाशिक येथे पार पडलेल्या विभागीय कृस्ती स्पर्धेत पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल ची विद्यार्थीनी कु. शरवरी कुलकर्णी तसेच बुरहानी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी यांची मुलगी हिने कुस्ती स्पर्धेत यश मिळवून सातारा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

बुरहानी

कु. शरवरी कुलकर्णीस शाळेचे मुख्याध्यापिका सौ. मनिषा पाटील, क्रिडा शिक्षक श्री. निलेश कुलकर्णी तसेच महावीर व्यायाम शाळा पाचोरा येथील कुस्तीपटू श्री. दिनेश पाटील याचे मार्गदर्शन लाभले.

विभागीय स्तराहून शाळेला हा बहुमान मिळवून दिल्याबद्दल कु. शरवरी कुलकर्णी चे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, इतर संचालक मंडळ तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Other Links

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page