आज दि. २४ जुलै २०२५ रोजी बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पाचोरा येथे मा. अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पाचोरा आदरणीय निमसे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती पाचोरा तसेच वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी शिबिर आयोजित करण्यात आले.
प्रथम शाळेच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यानंतर शिबिराचे अध्यक्षस्थान श्री. ताहेर भाई कपासी यांनी भूषविले. शिबिराची सुरुवात श्री. विसपुते सर यांनी मुलांना मोबाईलचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर ऍड.भाग्यश्री महाजन यांनी POCSO ACT बद्दल, व प्रा.वैशाली बोरकर यांनी POSH ACT- 2013 बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
तसेच प्रा.सुनिता गुंजाळ यांनी महिलांची सुरक्षितता सुरक्षितता याविषयी व सौ. ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे हक्क व कायदे याविषयी मार्गदर्शन केले तसेच ऍड.अंकुश कटारे यांनी कायदेशीर जागरूकता शिबिरे का घेतली जातात त्याचा आपल्याला काय उपयोग होतो याबाबत मार्गदर्शन केले.
सदर शिबिराच्या माध्यमाने विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागृतता निर्माण व्हावी व याचा त्यांच्या भविष्यासाठी खूप उपयोग होईल हा हेतू साध्य झाला. सदर शिबिराच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी साठी शाळेचे व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लाकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्राचार्या सौं मनीषा पाटील, उप. प्राचार्या सौं सोमपूरकर तसेच शाळेचे समस्त शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले व कायदे विषयक शिबीर यशस्वी झाले.