दिनांक 26 जुलै 2025 (शनिवार) रोजी न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल पुनगाव रोड, पाचोरा येथे घेण्यात आलेल्या रंगोत्सव आणि ओलंपियाड स्पर्धेत विविध विषयांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
मुलांच्या सर्वांगीण विकासाठी, त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेत विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. याप्रकारे रंगोत्सव अंतर्गत थंब प्रिंटिंग, ड्रॉइंग, कलरिंग, हॅन्डरायटिंग , कोलाज अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी , मेडल आणि गिफ्ट देण्यात आले.
तसेच ओलंपियाड परीक्षेमध्ये मॅथ, सायन्स, कॉम्प्युटर ,इंग्लिश ,जी. के. अशा विविध विषयांमध्ये इयत्ता पहिली ते दहावी मधील विद्यार्थ्यांना पहिल्या तसेच दुसऱ्या लेव्हलमध्ये कॅश प्राईज, गिफ्ट ,गोल्ड मेडल ,सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल मिळाले. सर्व विजयी विद्यार्थ्यांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे कार्यक्रमांच्या प्रमुख पाहुण्यांकडून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, व्हाईस चेअरमन श्री मुनव्वरभाई बदामी, प्राचार्य श्री ज्ञानेश्वर देवरे, सुपरवायझर सौ.सुमित्रा जगताप हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अश्विनी सोमवंशी यांनी केले.