पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज २६ जानेवारी २०२३ रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला. प्रजासत्ताक दिनी चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि स्काऊट गाईड ध्वजारोहण सौ. ज्युली फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आलेत. या कार्यक्रमात वर्ग जुनियर, सिनियर आणि १ लीच्या विद्यार्थ्यांनी ड्रील, वर्ग २ री च्या विद्यार्थ्यांनी पिर्यामिड तर वर्ग 3 रीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत यावर नृत्य सादर केले तसेच वर्ग ४ थी ते १० च्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक वस्त्र परिधान करून वेगवेगळ्या राज्यातील पारंपारिक नृत्य सादर केले.
कार्यक्रमा दरम्यान राज्य स्तरीय होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली विद्यार्थीनी कु. शरवरी कुलकर्णी हिचे संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी यांच्या हातून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, चेअरमन श्री. ताहेरभाई बोहरी, व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, सदस्य श्री. मुर्तुजाभाई बदामी, श्री. अब्बासभाई कपासी, श्री. हुजेफाभाई बोहरी, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राऊत, पर्यवेक्षक सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षक सौ. अस्मिता पाटील तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.