पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज ११ एप्रिल २०२३ रोजी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळी समाजाचे सचिव श्री. शरद गीते यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेचे प्रशाशक श्री बी. एन. पाटील यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनमोल कार्याविषयी विध्यार्थ्यास सविस्तर मार्गदर्शन केले.
