शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व भविष्याचा अचूक वेध घेणारे विविध टेक्नॉलॉजी ची माहिती व्हावी या उद्देशाने एम. के. सी. एल. पुणे, रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आरिवु (ARIVU) सेतू द्वारा मार्गदर्शन करण्यात आले.

भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IOT, वर्चुअल रियालिटी, VR ओर्ग्युमेंटेड रियालिटी, AI,ऑटोमोशन मध्ये सेन्सर्स चे महत्व, स्मार्ट फार्मिंग, 3 D Printing, एर्गोनॉमिक्स , सायबर सिक्युरिटी, गेमिंग सेन्सर्स, क्लिनिंग रोबोट, ऍडव्हान्स सोलर सिस्टम , जगातील सर्व भाषां मधील रोबोटिक्स आणि त्याचे महत्व अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

मार्गदर्शनासाठी धुळे येथून आलेले टिम समवेत, आशीर्वाद कम्प्युटर्स चे संचालक अतुल शिरसमणे, अजिंक्य कासार बाईट कम्प्युटरचे अभिजीत पाटील , हायटेक कम्प्युटरच्या सुरेखा पाटील, सिग्मा सेव्हन चे सिनेमा संदीप नेमाडे, रागिनी नेमाडे , एमटेक कम्प्युटरचे राजेंद्र पाटील, भावना पाटील युनिक कम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, यांनी मार्गदर्शन केले.
