३५. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे आस्था क्लिनिक पाचोरा द्वारा आयोजित डेंटल चेकअप आणि डेंटल हेल्थ जागरूकता कार्यक्रम संपन्न

photo
Welcome

आज ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी  बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे आस्था क्लिनिक द्वारा आयोजित डेंटल चेकअप आणि डेंटल हेल्थ संबधित जागरूकतेचा कार्यक्रम संपन्न झाला.

Dental Checkup

आस्था क्लिनिकचे संचालक डॉ. आनंद जैन, डॉ. नम्रता जैन आणि क्लिनिक टीम यांनी विद्यार्थ्याचे दंत स्वास्थ तपासून दातांची निगा कशी राखायची या संदर्भात सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Welcome to Viraj

३१ जानेवारी रोजी शाळेच्या नवीन इमारतीत सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार आणि शालेय स्पर्धा प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच शाळेतील माजी विद्यार्थी डॉ. विराज परदेशी याने नुकतच युक्रेन येथे डॉक्टर पदवी पूर्ण केल्याने पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.  

Gift Distribution

या प्रसंगी आस्था क्लिनिकचे संचालक डॉ. आनंद जैन, डॉ. नम्रता जैन आणि क्लिनिक टीम, डॉ. विराज परदेशी, संस्थेचे सेक्रेटरी श्री. मोहम्मद भाई बोहरी, शाळेचे व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लाकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका श्रीमती. भगवती राउत, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील, वरिष्ठ शिक्षिका सौ. ज्युली फर्नांडीस उपस्थित होते.

कार्यक्रमाचे  सूत्र संचालन सौ. प्रणिता पाटील आणि कार्यक्रमाचे यशस्वीते साठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page