पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रंगोत्सव तर्फे आयोजित चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत वर्ग सिनियर के. जी. ते इयत्ता तिसरी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते
त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी पूर्वी योगेश पाटील वर्ग 3 री हिने पटकवला आहे. तसेच वर्ग सिनियर के. जी. तील कु. आयुष योगेश पाटील, कु. प्रथम नितीन पाटील, कु. अथर्व अतुल देवरे, कु. नारायणी प्रशांत पाटील, कु. अरशान जुबेर देशमुख, कु. जैनाब मुज्जैद देशमुख आणि वर्ग 1 ली ते 3 री तील कु. श्रद्धा छगन चौधरी, कु. ईश्वरी कृष्णराव पाटील, कु. सायमा झाकीर चौधरी, कु. अनाबिया असिफ बागवान, कु. अंविता आनंद जाधव, कु. माहिरा फिर्दुस शेख, कु. रणविरसिंग धरमसिंग परदेशी, कु. मृण्मयी नितीन संसारे, कु. भूमी भूषण पाटील, कु. मोहदिस रेहान खान, कु. देवेंद्रसिंग मदनसिंग राजपूत या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून यांना बक्षीस, प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
बक्षिस वितरणाचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. हातिमभाई बोहरी, सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी व व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, पर्यवेक्षक सौ. अश्विनी सोमपुरकर, श्रीमती भगवती राऊत तसेच सुपरवायजर सौ. अस्मिता पाटील, श्री. उमेश मोरे व श्रीमती उषा अहिरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य प्राप्त करण्यामध्ये चित्रकला शिक्षक श्री. रोहित परदेशी व श्रीमती ज्युली फर्नांडिस यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी सौ. अस्मिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.