पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज १३ जानेवारी २०२३ रोजी रंगोत्सव तर्फे आयोजित चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत वर्ग ४ थी ते १० वी पर्यंतचे एकूण ६०० विद्यार्थी सहभागी झाले होते.
यात एकूण ८० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून यांना बक्षीस, प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
रंगोत्सव आयोजित स्पर्धेचे बक्षिस वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हाइस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, न्यू बुरहानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर देवरे, पर्यवेक्षक सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षक सौ. अस्मिता पाटील उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास श्री. जगताप साहेब ( गट शिक्षणाधिकारी पाचोरा तालुका ) , श्री. समाधान पाटील साहेब ( शिक्षण विस्तार अधिकारी पाचोरा ) व श्री. अभिजित खैरनार साहेब ( केंद्र प्रमुख भातखंडे केंद्र ) यांची अनमोल उपस्थिती कार्यक्रमास लाभली.
विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य प्राप्त करण्यामध्ये चित्रकला शिक्षक श्री. रोहित परदेशी, श्रीमती ज्युली फर्नांडिस व सौ. मेरी जोसेफ यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या बक्षिस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.