पाचोरा येथील बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आज २२ फेब्रुवारी २०२३ रोजी लोकमत आयोजित संस्कारांचे मोती स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या स्पर्धेत वर्ग ४ थी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हा. चेअरमन श्री. मुस्तफाभाई लकडावाला, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, पर्यवेक्षिका सौ. अश्विनी सोमपुरकर यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. यात एकूण १० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त करून यांना बक्षीस, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांच्या तर्फे प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
तसेच या बक्षिस वितरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.