४२. बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूल, पाचोरा येथे क्रीडा दिन उत्साहात संपन्न

पाचोरा येथील बुरहाणी इंग्लिश मिडियम स्कूल (न्यू बिल्डिंग) येथे दिनांक ८ डिसेंबर २०२५ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत वार्षिक क्रिडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिडा महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन अंतिम फेरीतील खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्या विजेत्या व उपविजेत्या विद्यार्थ्यांचा आज पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

या क्रीडा दिनात धावणे, बलून फुगवणे, दोरी उड्या, चेंडू बादलीत टाकणे या प्रकारचे विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धां दरम्यान विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्य, संघ भावना आणि जिद्द दाखवली.

आज झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रोफी मेडल आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विविध खेळखेळल्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक विकास, शिस्त आणि आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहम्मदभाई बोहरी, शाळेचे चेअरमन श्री. ताहेरभाई बोहरी, व्हाईस चेअरमन श्री. मुस्ताफाभाई लकडावाला, न्यू. बुरहानी शाळेचे व्हाईस चेअरमन श्री. मुनावर बदामी, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, प्री-प्रायमरी मुख्याध्यापिका भगवती राउत, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक तसेच आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या क्रीडा दिनामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण होऊन निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रणिता पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page