४४. बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी बुरहाणी इंग्लिश मीडियम स्कूल येथे भारताचा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात, शांत व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी नियोजित वेळेनुसार कार्यक्रमास सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ध्वजारोहण पार पडले. ध्वजारोहण श्री. मुस्तफाभाई लाकडावाला यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन करून तिरंग्याला मानवंदना दिली. संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला.

patriotic_song_dance

ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत, सांस्कृतिक नृत्य व शिस्तबद्ध ड्रिल सादर केली. विद्यार्थ्यांच्या ड्रिलमध्ये शिस्त, एकसूत्रता व समन्वयाचे उत्कृष्ट दर्शन घडले. नृत्य व गीत सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी देशप्रेम व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे मांडला.

staff_photo

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. शिक्षकवृंदांनी कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन यशस्वीपणे पार पाडले. सर्व कार्यक्रम वेळेत व सुयोग्य नियोजनानुसार पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रवी अग्रवाल, श्री. ओमप्रकाश राठी, डॉ. अविनाश शर्मा, श्री. दिलिप कोतकर, श्री. निलेश सोनावणे उपस्थित होते. तसेच सेक्रेटरी श्री. मोहम्मदभाई बोहरी, श्री. मुर्तुजाभाई बदामी, मुस्तफाभाई बोहरी, श्री. अदनानभाई लाकडावाला, मोहम्मदभाई भडगाववाला यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page