पाचोरा येथील बुरहाणी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला फन फेअर कार्यक्रम अत्यंत उत्साहात, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या यशस्वी रित्या पार पडला.

या फन फेअर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन खाद्यपदार्थांचे व खेळांचे विविध स्टॉल्स लावले होते. लहान वयातच विद्यार्थ्यांनी स्टॉल्सचे नियोजन, सजावट, विक्री, व्यवस्थापन तसेच व्यवहारिक बाबींची जबाबदारी स्विकारून प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव, व्यवहार ज्ञान व सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.

फन फेअरमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच मनोरंजक खेळांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल्सना पालक, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.
