बुरहाणी इंग्लिश मीडियम स्कूल, पाचोरा येथे फन फेअर उत्साहात संपन्न..

पाचोरा येथील बुरहाणी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला फन फेअर कार्यक्रम अत्यंत उत्साहात, आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या यशस्वी रित्या पार पडला.

या फन फेअर कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन खाद्यपदार्थांचे व खेळांचे विविध स्टॉल्स लावले होते. लहान वयातच विद्यार्थ्यांनी स्टॉल्सचे नियोजन, सजावट, विक्री, व्यवस्थापन तसेच व्यवहारिक बाबींची जबाबदारी स्विकारून प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव, व्यवहार ज्ञान व सामाजिक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली.

फन फेअरमध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच मनोरंजक खेळांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉल्सना पालक, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी शिक्षणाची गोडी निर्माण करणे, व्यवहारिक शिक्षण देणे, संघभावना, नेतृत्वगुण व उद्योजकतेची प्राथमिक ओळख करून देणे हा होता. प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा फन फेअर कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शाळेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी, पालक व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page