दिनांक- ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा झाला.
निरोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सोनलकर अकॅडमी जळगाव चे संचालक श्री. कबीरजी सोनलकर, श्री. खलीलदादा देशमुख यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री हातिम भाई बोहरी, शाळेचे चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हा. चेअरमन श्री. मुस्ताफाभाई लकडावाला तसेच न्यू. बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल चे चेअरमन श्री. मुस्ताफाभाई भडगाववाला, व्हा. चेअरमन श्री. मुन्नवरभाई बदामी, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्राचार्य श्री. डी. पी. देवरे, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, पर्यवेक्षिका सौ. अश्विनी सोमपुरकर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्राचार्य, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली.