४५. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल, पाचोरा येथे आजी-आजोबा दिन आनंदात साजरा

पाचोरा : बुरहानी इंग्लिश मीडियम स्कूल (नवीन इमारत), संभाजी नगर, पाचोरा येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी आजी-आजोबा दिन आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात Senior KG A च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीतावरील सुंदर नृत्याने झाली. त्यानंतर नर्सरी, ज्युनिअर आणि सीनियर KG B च्या विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांच्या जुन्या गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

विद्यार्थ्यांसाठी आणि आजी-आजोबांसाठी खास पाहेल्या (Puzzles) आणि गाणे ओळखा (Song Guessing) या मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये आजी-आजोबांनी आनंदाने सहभाग घेतला व संपूर्ण परिसर हास्याने दुमदुमून गेला.

तसेच Senior KG A च्या विद्यार्थ्यांनी सासू-सासरे आणि सुनेच्या आजकालच्या वागणुकीवर आधारित एक सामाजिक संदेश देणारे लघुनाट्य सादर केले. या नाटिकेने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले आणि भरभरून टाळ्या मिळाल्या.

संपूर्ण कार्यक्रम प्रेमळ, कौटुंबिक आणि आनंददायी वातावरणात पार पडला. आजी-आजोबांसोबत मुलांनी घालवलेले हे क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रियंका भावसार आणि सौ. साधना पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page