दिनांक- 2 फेब्रुवारी 2023 रोजी न्यू बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्काऊट गाईड तर्फे फन फेअर कॅम्प चे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. हातिम भाई बोहरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव. श्री मोहम्मदभाई बोहरी, शाळेचे चेअरमन श्री. मुस्तफाभाई भडगाववाला, व्हा. चेअरमन श्री. मुनव्वरभाई बदामी, प्रशासक श्री. बी. एन. पाटील, प्राचार्य श्री. डी.पी. देवरे, बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूलचे प्री-प्रायमरी मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राऊत, पर्यवेक्षिका सौ. सुमित्रा जगताप तसेच पर्यवेक्षिका सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील, श्रीमती ज्युली फर्नांडिस, श्री. शरद गीते, श्री. पवन पाटील आणि पाचोरा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्रीखंडे साहेब यांची देखील उपस्थिती लाभली.
स्काऊट गाईड – फन फेअर कार्यक्रमांमध्ये इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील स्काऊट आणि गाईड( विद्यार्थी ) यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे एकूण 30 स्टॉल लावले. या कार्यक्रमामध्ये सर्व पाहुणे मंडळी, शाळेतील बाकी सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणून आनंद घेतला.
कार्यक्रमाची संकल्पना शाळेचे स्काऊट आणि गाईड चे शिक्षक श्री. रविंद्र पाटील यांनी मांडली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्राचार्य, पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.