४०. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल, पाचोरा येथे रांगोळी स्पर्धा संपन्न

बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा, येथे आज रोजी ०२ ऑगस्ट २०२५ रोजी इयत्ता ३ री आणि ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी “एक पेड मां के नाम” या संकल्पनेवर आधारित आणि विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना वाव मिळण्यासाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

तसेच शाळेतील कला शिक्षिका सौ. योगिता पाटील यांनी ” एक पेड मां के नाम ” या संकल्पनेवर आधारित एक भव्य अशी रांगोळी शाळेच्या आवारात काढून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला.

या रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या मनमोहक असे रांगोळ्यांचे कलर तसेच फुल, पान यांचा उपयोग करून छान अश्या रांगोळ्या काढून आपल्या कला गुणांचे प्रदर्शन केले. 

या कार्यक्रमाप्रसंगी बंधन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. तुषार नहाटा, कार्यकारी व्यवस्थापक श्री. सुयोग पांढारकर तसेच शाळेचे व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफा लकडावाला, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील या मंचावर उपस्थित होते.  या प्रसंगी बंधन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. तुषार नहाटा यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले तसेच श्री. मुस्तफा लकडावाला यांनी बंधन बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. तुषार नहाटा यांचे स्वागत केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page