International Yoga Day – आज दि.२१/०६/२०२५ रोजी बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या योगदिनी पाचोरा येथील डॉ. पंकज नानकर यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना लाभले.
संपूर्ण जगभरात २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस का म्हणून साजरा केला जातो? या दिवसाला अत्यंत मोठे महत्व का आहे? योग केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास कश्या प्रकारे मदत होते या प्रकारचे मार्गदर्शन डॉ. पंकज नानकर यांनी केले तसेच विविध योग प्रात्यक्षिक करत सर्व मुलांकडून ही करून घेतले.
तसेच शाळेचे शिक्षक श्री. मनोरे सर तसेच इतर शिक्षक वृंद यांनीही मुलांना योग काय असतो? का करावा? याचे महत्व मुलांना पटवून सर्वांचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील प्रशासकीय अधिकारी श्री. बी. एन. पाटील, प्राचार्या सौ. मनीषा पाटील, उप-प्राचार्या सौ. अश्विनी सोमपुरकर, प्री- प्रायमरी मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राउत, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.