३६. बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

आज १६ जून २०२५ रोजी  बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये २०२५-२६ या  शैक्षणिक वर्षाची जल्लोषात सुरवात करण्यात आली.

new year1

आज रोजी उपस्थित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी रांगोळ्या तसेच शाळेच्या इमारतीची सजावट करण्यात आलेली होती. विविध ठिकाणी स्वताच्या हाताने तयार केलेले सेल्फी पोइंट तयार करण्यात आले.

new year2

शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरवात दैनंदिन प्रार्थनेने करण्यात आली. शाळेच्या प्रथम दिनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. हातीमभाई बोहरी, सेक्रेटरी श्री. मोहम्मदभाई बोहरी, चेअरमन श्री. ताहेरभाई कपासी, व्हाईस चेअरमन श्री. मुस्तफाभाई लाकडावाला, श्री. मुस्ताफाभाई लोखंडवाला, बुरहानी शाळेचे प्रशासक श्री. बी. एन. पाटील, मुख्याध्यापिका सौ. मनीषा पाटील, प्री-प्रायमरी चे मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राउत, उपमुख्यध्यापिका सौ. अश्विनी सोमपुरकर, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले आणि सर्व मुलांना चॉकलेट ही वाटण्यात आले.

new_year

कार्यक्रमानंतर मुलांनी शाळेच्या आवारात तयार करण्यात आलेला सेल्फी पोइंट मध्ये फोटो काढून आनंद व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

new year

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page