आज २८ जुलै २०२४ रोजी बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा येथे जागतिक निसर्ग संवर्धन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनी वर्ग नर्सरी ते वर्ग ४ थी च्या मुलांनी वेगवेगळ्या रोपे आणलेली होती. यात गुलाब, शेवंती, जास्वंद, मोगरा, आंबा, निंब तसेच शुशोभिकरणासाठी असलेल्या रोपांचा यात समावेश होता.
या प्रसंगी आणलेल्या रोपांचा वापर करून शाळेच्या पटांगणात TREE असे नाव तयार करून मुलांना आजूबाजूला बसवून वेगवेगळ्या प्रकारची खेळ खेळण्यात आली तसेच मुलांना निसर्ग, निसर्गात होत चाललेले बदल आणि झाडांचे आपल्या जीवनात असलेले महत्व पटवून निसर्गाचे संवर्धन कसे करावे हे हि सांगण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाची रूपरेषा प्री-प्रायमारी च्या मुख्याध्यापिका श्रीमती भगवती राउत, पर्यवेक्षिका सौ. अस्मिता पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आखली.